शेतकरी सहवेदनेसाठी महाराष्ट्रात सर्वदूर उपोषण

शेतकरी सहवेदनेसाठी महाराष्ट्रात सर्वदूर उपोषण

आंबाजोगाई – 19 मार्च रोजी शेतकरी सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर उपवास केला जाणार आहे. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. 2017 पासून दर वर्षी […]

आंबाजोगाई – 19 मार्च रोजी शेतकरी सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर उपवास केला जाणार आहे. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. 2017 पासून दर वर्षी उपोषण, उपवास किंवा अन्नत्याग केला जातो. या वर्षी दोन्ही शेतकरी संघटना व अनेक स्थानिक संस्था व संघटना सहभागी झाल्या आहेत. 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती, ते चिलगव्हाण (जि यवतमाळ) चे राहणारे, या गावात याही वर्षी सुतक पाळले जाणार असून सामूहिक उपोषण केले जाणार आहे. 

अमरावतीच्या पंचवटी चौकात राष्ट्रीय ओबीसी किसान संघाच्या वतीने उपोषण केले जाईल. वाशीम जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटना ठिकठिकाणी उपोषण करीत आहे. वरुड, मोर्शी, वाटोर, पापड येथे किसानपुत्र व अन्य संघटना मिळून उपवास करीत आहेत. नागपूर, काटोल, उमठा, सावनेर, मूर्तिजापूर, आकोट आदी ठिकाणी उपोषण होणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील क्रांती चौकात दिवसभर उपोषण होईल. आंबाजोगाई, धारूर, दिंद्रुड, घटनांदूर, परभणी जिल्ह्यातील दैठणा,जालना जिल्ह्यातील परतूर, वाढोना, जवळाबाजार, साटंबा व लातूर जिल्ह्यातील पानगाव, उदगीर आदी ठिकाणी उपोषणाला लोक बसणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जय किसान भेटकरी संघटनेच्या वतीने पेठ वडगाव येथे उपोषण केले जाणार आहे, नाशिक जिल्ह्यात मुंगसरे, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिर येथेही उपोषण होणार आहेत. या शिवाय अर्क गावात उपोषणाची तयारी झाली आहे.

पदयात्रा – किनगाव (जळगाव) ते धुळे अशी 110 किमी अंतराची पदयात्रा करण्यात आली . ही पदयात्रा 13 मार्चला निघाली व व9 मार्चला धुळ्याला पोचत आहे. या पदयात्रेत सहभागी लोकांची नावे पुढीलप्रमाणे आहे. डॉ राजीव बसरगेकर (नवी मुंबई, जिल्हा ठाणे), रामकिशन अप्पा रुद्राक्ष, (जवळाबाजार जिल्हा हिंगोली), सुभाष कच्छवे, (परभणी), बालाजी आबादार, (नांदेड), निळकंठ डांगे, (जवळा बाजार, जिल्हा हिंगोली.) , सतीश गलांडे (परभणी) , विठ्ठलदास डांगे, (कंधार जि नांदेड) , ऋतगंधा देशमुख, (जळगाव).

Tags:

LatestNews

अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरातून राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पनवेल महापालिकेचा देशात 6 वा क्रमांक
गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला कोकणातून पनवेल शहर पोलिसांनी अटक
घरकाम करणाऱ्या नोकराने मारला डल्ला
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड
गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी
बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!