गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला कोकणातून पनवेल शहर पोलिसांनी अटक
पनवेल :

प्रशांत पाटील या इसमाला आरोपी असदुल्ला उस्मान मिरकर (वय २८ रा. माणगाव), जुबेर मुजावर (वय २५ रा दापोली) यांनी पनवेल बस डेपोच्या बाहेरील रस्त्यामध्ये या इसमाला गाडीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बसवून त्याला नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग पळस्पे येथे आणून त्याला मारहाण करून त्याच्या कंदील ७ हजार रुपये कितमीचा मोबाईल फोन तसेच त्याच्या गुगल पे वरून ६ हजार १०० रुपये काढून घेतले तसेच त्याच्या कडे असलेली ६०० रुपये रोख रक्कम आणि इतर महत्वाचे कागदपत्र काढून घेऊन त्याला मारहाण आणि धमकी देऊन मुद्देमाल घेऊन ते पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोहवा अमोल पाटील, पोहवा संदेश म्हात्रे, पोहवा सूर्यकांत कुडावकर, पोना सम्राट डाकी, पोना मिथुन भोसले, पोशी विशाल दुधे आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींचा शोध घेतला असता एक आरोपी चिपळूण परिसरातून तर दुसऱ्या आरोपीला माणगाव परिसातून ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

About The Publisher
