स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पनवेल महापालिकेचा देशात 6 वा क्रमांक

कचरामुक्त शहर मानांकनात थ्री स्टार ,ओडीएफमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन कायम

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पनवेल महापालिकेचा देशात 6 वा क्रमांक

पनवेल :

 

Read More अन् व्हायरल व्हिडिओ वरील कमेंट ने पोलिसांची उरली सुरली इज्जत ही उतरली... 'याच्या आई बापानं याचं बारसं घातलं नाही ये'... अन्य कमेंट नक्की वाचा...

Read More ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल शहराने स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये देशपातळीवर आणि राज्यपातळीवर भरीव कामगिरी बजावली आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणामध्ये या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये तीन लाख ते दहा लाख लोकसंख्या गटात पनवेल महानगरपालिकेला देशात सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. हा सन्मान म्हणजे पनवेल शहराच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेल्या कार्याची पावती आहे. कचरामुक्त शहर मानांकनात थ्री स्टार आणि ओडीएफमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस ही सर्वोच्च श्रेणीदेखील शहराने सलग राखली आहे.

 

महापालिकेस मिळालेल्या या यशाबद्दल आज झालेल्या प्रशासकीय महासभेत आयुक्त श्री. चितळे यांनी घनकचरा व स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते व त्यांच्या टिमचे  यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Read More तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 

 

स्वच्छतेच्या आघाडीवर केवळ क्रमांकच नव्हे तर गुणवत्तेचेही मानांकन मिळवण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले आहे. या यशाबरोबरच पनवेल महानगरपालिकेने आपल्या यशाची परंपरा कायम राखत कचरामुक्त शहर मानांकनात “ थ्री स्टार मानांकन (3-Star Garbage Free City) शहराने सलग चौथ्या वर्षी कायम राखले आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतागृह वापर यामधील उत्कृष्ट कार्यासाठी ODF (Open Defecation Free) कॅटेगरी मधील “वॉटरप्लस (Water Plus ) ही सर्वोच्च श्रेणीदेखील शहराने सलग राखली आहे. हे मानांकन शहरातील स्वच्छतेबाबतची नागरिकांची जाणीव, शिस्तबद्धता आणि महानगरपालिकेच्या सततच्या प्रयत्नांचे फलित आहे.

 

या यशामध्ये  महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे कुशल मार्गदर्शन, तसेच उपायुक्त डॉ. वैभव विधाते आणि सहा. आयुक् श्रीराम पवार, विभाग प्रमुख  अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका अभियंता,  स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या टीमने संपूर्ण अभियानासाठी विशेष नियोजन, मार्गदर्शन आणि अंमलबजावणी करीता उल्लेखनीय मेहनत घेतली. सर्वेक्षणाच्या वेळी शहरातील विविध स्वच्छता उपक्रम, जनजागृती मोहिमा, नागरिकांचा सहभाग आणि तांत्रिक व व्यवहार्य उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. यामुळेच पनवेल शहर हे स्वच्छतेच्या बाबतीत एक आदर्श मॉडेल ठरले आहे.IMG-20250717-WA0038(1)

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तरातून राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १६ विधेयके मंजूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पनवेल महापालिकेचा देशात 6 वा क्रमांक
गाडीत लिफ्ट देऊन प्रवाश्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दुकलीला कोकणातून पनवेल शहर पोलिसांनी अटक
घरकाम करणाऱ्या नोकराने मारला डल्ला
रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड
गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी
बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!