शहरात डेंग्यूचे थैमान नगर पालिकेची बघ्याची भुमिका; राष्ट्रवादी कडून वाजतगाजत भीकमागो आंदोलन
By Yuva Aadarsh
On
परतूर । प्रतिनिधी – गेल्या दोनतीन महिन्यापासून परतूर शहरात डासांची संख्या वाढल्याने, नागरिकांना ताप, मलेरिया, चिकन गुनिया, डेंग्यू सारख्या आजाराने ग्रस्त असताना नगरपालिकेने मात्र कोणतीही […]
परतूर । प्रतिनिधी – गेल्या दोनतीन महिन्यापासून परतूर शहरात डासांची संख्या वाढल्याने, नागरिकांना ताप, मलेरिया, चिकन गुनिया, डेंग्यू सारख्या आजाराने ग्रस्त असताना नगरपालिकेने मात्र कोणतीही उपाययोजना न केल्याने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस ने शहरात वाजत गाजत भिक मागो आंदोलन करत नगरपालिका कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे विनायकराव काळे, अंकुशराव तेलगड, विजय नाना राखे, अखिल काजी, सय्यद आरेफ अली, कदीर कुरेशी, परवेज देशमुख, रजाक कुरेशी, संजय राऊत, सत्यम मगर, काजी सर, लाला मिया बागवान, अन्वर पठाण, निसार चाऊस, गोरे मिया कायमखानी सह अनेकांनी सहभाग घेतला.यानंतर नगरपालिकेला उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदनही देण्यात आले.

Tags: NCP PARTUR
About The Publisher
