शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि २९ :-  शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मदत वेळीच संबंधित मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळाली पाहिजे. चौकशी प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने एक महिन्यात मार्गी लावावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी आज दिल्या.

मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीला सह सचिव  कैलास गायकवाड, अवर सचिव सुनील सामंत उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागीय आयुक्त  दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी या बैठकीत सन २०२३ व २०२४ मधील शेतकरी आत्महत्या मदत प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणे  त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तालुकास्तरीय समितीने संबंधित यंत्रणांकडून आवश्यक असणारा अहवाल प्राप्त करून घ्यावा. जिल्हास्तरावरही प्रलंबित प्रकरणाचा  नियमित आढावा घेऊन प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावावीत. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणांचा आढावा घ्यावा. शेतकरी आत्महत्या मदतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री श्री. जाधव -पाटील यांनी सांगितले.

Read More “TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”

००००

Read More दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन

एकनाथ पोवार/स.सं/

Read More सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन