खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार; आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रश्‍नानंतर - मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

खातेदारांची फसवणूक टाळण्यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार; आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रश्‍नानंतर - मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

मुंबई - ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने लोकांचे बुडवलेले पैसे परत करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. याबाबत स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. 

या उत्तरादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रमाणे इतर कुठलाही सोसायटीच्या वतीने खातेदारांची फसवणूक होऊ नये यासाठी फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट सुरू करणार असल्याची माहिती दिली. या युनिटच्या माध्यमातून अधिकचा व्याजदर कसा दिला जाईल या संदर्भात संबंधित सोसायटीला या युनिटला कळवावे लागणार आहे त्यामुळे त्यांचा अत्याधिक व्याजदर देताना त्यांना कुठल्या माध्यमातून दिला जाणार आहे याबाबतचा खुलासा करणे अपेक्षित असणार आहे. 

त्याचबरोबर या घोटाळ्याच्या संदर्भाने सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील मागील आठवड्यात उत्तर दिले होते त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री व ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणारे आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे. अशी माहिती देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. 

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन