अमान्य... मान्य... अमान्य... आवाज अन् गोंधळात शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली; विद्यमान संचालकांचाही काही ठरावांना विरोध; सभेचा केला निषेध; अध्यक्षांनी आरोप फेटाळले

अमान्य... मान्य... अमान्य... आवाज अन् गोंधळात शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली; विद्यमान संचालकांचाही काही ठरावांना विरोध; सभेचा केला निषेध; अध्यक्षांनी आरोप फेटाळले

 
जालना । प्रतिनिधी - अमान्य... मान्य... अमान्य... आवाज अन् गोंधळात त्याच बरोबरच काही विद्यमान संचालकाच्या निषेधाने जालना व बदनापूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या जालनाची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि 29) रोजी पार पडली. 
जुना जालना भागातील एका कार्यालयात ही वार्षिक सर्वसाधारण सभा गुंडाळण्यात आली. 
सभेत वार्षिक लेखा परिक्षण हे शासकीय लेखा परिक्षकामार्फत व्हावे अशी मागणी सभासदांनी लावून धरली. खाजगी लेखा परिक्षकांकडून लेखा परिक्षण करून घेण्यामागे संस्थेंच्या संचालकांचे आर्थिक हित असल्याचा आरोप सभेसमोर काही सभासदांनी केला. महत्त्वाचे म्हणजे हे लेखा परिक्षक संस्थेच्या अध्यक्ष-सचिवांना 50टक्के रिटर्न गिफ्ट देत असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. पतसंस्थेत चार-पाच कर्मचारी आहेत. त्यामुळे त्या कर्मचार्‍यांकडून सभेचे इतिवृत्त हे सर्वांसमोर लिहून घेतले गेले पाहिजे. त्यात सभासदांचे म्हणणे त्यात मांडणे आवश्यक असल्याचेही काही सभासदांनी सभेत म्हटले. संस्थेचे सचिव कोठे आहेत ते का बोलत नाहीत, असा प्रश्‍नही यावेळी काहींनी उपस्थित केला. 
एकीकडे सभासदांकाडून सभेत आरोप होत असतांना दुसरीकडे चेअरमन विकास पोथरे यांनी सर्व आरोप धुडकावून लावत सभा सर्व ठराव मंजूर करून संपन्न झाल्याचे शेवटी घोषित केले.
जालना व बदनापूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या जालनाची 44 वी सर्वसाधारण सभा व्यव्यस्थित पार पडली. सर्व ठराव बहुमतांनी मान्य करण्यात आली. विविध कल्याणकारी योजना, विविध प्रकारचे कर्ज, कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, शासकीय ऑडीटर कडून ऑडीट व्हावे अशी सभासदांची मागणी आहे याबद्दल बोलतांना चेअरमन श्री पोथरे यांनी संस्थेचे ऑडीट सरकारी पॅनलवरील लोकं निवडले जातात तो संचालक मंडळ निर्णय घेतो ते सर्वसाधारण सभेत ठेवले जाते तेथे त्याला मान्यता मिळते असे म्हंटले तर कंत्राटी भरती सातत्य दिले या विषयी सभासदांच्या आक्षेपाबाबदत विचारले असता, कंत्राटी भरती केलेल्यांना सेवा सातत्य दिले असल्याचे चेअरमन विकास पोथरे यांनी युवा आदर्शशी बोलतांना सांगितले. 

LatestNews

अमान्य... मान्य... अमान्य... आवाज अन् गोंधळात शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली; विद्यमान संचालकांचाही काही ठरावांना विरोध; सभेचा केला निषेध; अध्यक्षांनी आरोप फेटाळले
सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !
‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन
शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम