मुली आणि महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे आयोजन
जालना । प्रतिनिधी - जिल्ह्यातील बरोजगार महिला आणि मुलींसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी दि. 20 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा मोरे यांनी केले आहे.
उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शाळकरी मुली आणि महिलावर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी महिलांना सक्षम करुन त्यांच्या सुरक्षेसह रोगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय तसेच महिला उद्योगपती, महिला अधिकारी यांच्या वाहनावर महिलांना वाहनचालक म्हणून नियुक्ती दिल्यास शाळकरी मुली आणि महिलावरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल, हा या उपक्रमाचा हेतु आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून 19 ते 35 वयोगटातील गरजू मुली अथवा महिला लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बेरोजगार, विधवा, परित्यक्ता महिलांना या प्रशिक्षासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या मुली बेरागजागर आहेत आणि पोलीस भरतीची तयारी करीत आहेत, अशा मुलींनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना शाळा किंवा महाविद्यालयाच्या स्कुल व्हॅन किंवा महिलांच्या वाहनावर वाहन चालक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय ड्रायव्हिंग प्रशिक्षण पुर्ण केलेल्या मुलींना आणि महिलांना 10 दिवसाचे स्वसंरक्षण आणि शारीरीक विकास या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे गरजू मुली आणि महिलांनी जास्तीत-जास्त अर्ज करावेत असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ करुणा मोरे यांनी केले आहे.
अर्ज भरण्याची लिंक पुढील प्रमाणे आहे. https://forms.gle/SrejVcVk1vD1tbXy9

About The Publisher
