राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार;

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार;

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत असल्याचे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. https://results.digilocker.gov.in

२. https://sscresult.mahahsscboard.in

Read More दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

३. http://sscresult.mkcl.org

Read More छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

४. https://results.targetpublications.org

Read More स्टार्टअप ही लोकचळवळ झाली पाहिजे – मंत्री मंगलप्रभात लोढा

५. https://results.navneet.com

६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

८. https://www.indiatoday.in/education-today/results

९. https://www.aajtak.in/education/board-exam-results

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. तसेच https://mahahsscboard.in  (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक १४ मे २०२५ ते बुधवार, दिनांक २८ मे २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्त्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५ मे २०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

LatestNews

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर होणार;
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन
येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुली आणि महिलांसाठी मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार! नगर परिषदेच्या पावती पुस्तकावर अद्यापही वसुली; आर्थिक घोटाळ्याची शक्यता; विविध बाजार ठेक्यांमध्येही धांदली? बाजारात तर वसुली वाल्यांकडून दमदाटी आणि धमकी!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा