10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या

10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या

सांगली -  राज्यात गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडाडीची मोहीम हाती घेतली असून लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यास 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. आता, लाच मागितल्या प्रकरणी सांगली  महापालिकेचे उपायुक्तच लाच-लुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. तब्बल 7 लाख रुपयांची लाच  मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिका क्षेत्रातल्या एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 10 लाखांची मागणी करून 7 लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधित तक्रारदाराच्या सांगण्यावरुन सापळ रचला. त्यानुसार, तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे उपायुक्त महोदयांनी 7 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यावरुन, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील कारवाईनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, एसीबी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

LatestNews

10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या
लखनऊत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हजारो पदाधिकार्‍यांनी घेतला दंगामुक्त उत्तर प्रदेशाचा संकल्प
गोवंश हत्त्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करा; बजरंग दल, गोरक्षकांच्यावतीने बस स्थानक परीसरात रास्ता रोको आंदोलन
महसुली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी महसूल विभागाला बहुउद्देशीय वाहने – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली
पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस