गोवंश हत्त्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करा; बजरंग दल, गोरक्षकांच्यावतीने बस स्थानक परीसरात रास्ता रोको आंदोलन

गोवंश हत्त्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करा; बजरंग दल, गोरक्षकांच्यावतीने बस स्थानक परीसरात रास्ता रोको आंदोलन

जालना । प्रतिनिधी - शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्त्या होत असून गोवंश बंदी कायदा केवळ कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बजरंग दल, गोरक्षकांच्यावतीने सोमवार (दि 9) रोजी बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

शहरातील राजा बाग शेर सवार कब्रस्तानसमोर महानगरपालिकेच्यावतीने बकरी ईद निमित्त कुर्बानीनंतरचे वेस्टज टाकण्यासाठी मोठा खड्डा केला होता. या खड्यात गोवंशाचे मास आढळून आल्याने शहरभरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. व मासाचे नमुने घेऊन तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. 

दरम्यान या घटनेनंतर बजरंग दल व गोरक्षक आक्रमक झालेले पहायला मिळाले. बस स्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. राज्यात गोवंश हत्त्या बंदी कायदा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. सर्रासपणे गायींची कत्तल केली जात आहे. त्यांची वाहतूक केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. 

त्यामुळे गोवंश हत्त्या बंदी कायदा हा केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी बजरंग दल आणि गोरक्षकांनी केली आहे. तसेच गोहत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली.

Read More मनपाच्या त्या जाहीर आवाहननंतर नागरिकांचे आक्षेप दाखल; त्या रस्त्यावरील बाजार बंद करण्यात यावा...

LatestNews

10 लाखांच्या लाचेची मागणी, 7 लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात; ACB ने ठोकल्या बेड्या
लखनऊत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हजारो पदाधिकार्‍यांनी घेतला दंगामुक्त उत्तर प्रदेशाचा संकल्प
गोवंश हत्त्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करा; बजरंग दल, गोरक्षकांच्यावतीने बस स्थानक परीसरात रास्ता रोको आंदोलन
महसुली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी महसूल विभागाला बहुउद्देशीय वाहने – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली
पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस