अनुदानाची रक्कम ज्यांच्या खात्यातून वर्ग झाली त्या तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करा; आमदार बबनराव लोणीकरांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

अनुदानाची रक्कम ज्यांच्या खात्यातून वर्ग झाली त्या तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करा; आमदार बबनराव लोणीकरांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान तारांकित प्रश्न, लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवणार

वर्ग केलेली रक्कम वसूल करण्यासाठी दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा टाका

जालना | प्रतिनिधी - अंबड व घनसावंगी बोगस अनुदान वाटपाचा घोटाळा मतदार बबनराव लोणीकरच्या माध्यमातून उघडकीस आला असून हा घोटाळा 100 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो असे सुद्धा वाच आमदार बबनराव लोणीकर यांनी पहिल्याच दिवशी दिले होते त्यानुसार माहिती घेतली असता हा घोटाळा 76 कोटी रुपयांपर्यंत असल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाने दिले आहे त्यामध्ये वर्गीकरण करत बोगस अनुदान लाटणारे दुबार नावाने अनुदान लागणारे गायरान जमिनीवर अनुदान लागणारे कुठल्याही प्रकारची जमिनीची नोंद नसताना केवळ आधार कार्डावर नावाच्या आधारे अनुदान लागणारे अशी तपासणी सद्यस्थितीत सुरू असून आतापर्यंत 24 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांना देण्यात आली.

जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मणियार अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रीवार उपजिल्हाधिकारी श्रीमती दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारी राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीदरम्यान आमदार लोणीकर बोलत होते. यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर पुढे म्हणाले की, महसूल प्रशासनाने अनुदान घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठ्यांना तात्काळ निलंबित केले असून जिल्हा परिषद व कृषी विभागाने मात्र अद्याप दोषी ग्राम विकास अधिकारी अर्थात ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही ही बाब अत्यंत गंभीर असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी बैठकीदरम्यान कडक शब्दात सूचना केली 

ज्याप्रमाणे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक अशा 76 अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कोणी अपेक्षित आहे, तसेच ज्या तहसीलदार यांच्या खात्यातून ही रक्कम वर्ग करण्यात आली ते देखील तितकेच दोषी असून संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई तात्काळ करणे अपेक्षित आहे असे न झाल्यास त्यांचे वरिष्ठ त्यांना पाठीशी घालत आहेत असा त्याचा अर्थ निघेल व येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई तर होईलच परंतु भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील मोठी कारवाई होऊ शकते असा इशारा देखील आमदार लोणीकरांनी यावेळी दिला.

अनुदान घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले उपविभागीय अधिकारी तहसीलदार तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक या सर्वांच्या खाजगी मालमत्तेवर बोजा टाकून चुकीच्या पद्धतीने वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची वसुली करावी. जोपर्यंत अनुदान घोटाळ्यातील रक्कम पूर्णपणे वसूल होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहील तसेच विधिमंडळ अधिवेशनादरम्यान या विषयावर तारांकित प्रश्न लक्षवेधी सूचना अर्धा तास चर्चा तसेच अवचित त्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार असून दोषींवर ठोस कारवाई करणे अपेक्षित असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

Read More ‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन

LatestNews

अमान्य... मान्य... अमान्य... आवाज अन् गोंधळात शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली; विद्यमान संचालकांचाही काही ठरावांना विरोध; सभेचा केला निषेध; अध्यक्षांनी आरोप फेटाळले
सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !
‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन
शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम