घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या 9 हॉटेल चालकांवर कारवाई; जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई; घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर जप्त

घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या 9 हॉटेल चालकांवर कारवाई; जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाची कारवाई; घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर जप्त

जालना । प्रतिनिधी - जालन्यात व्यवसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या 9 हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आलीय. जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने ही कारवाई केलीय. या कारवाईत घरगुती वापराचे 17 गॅस सिलिंडर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने जप्त केलेत. जालना शहरात काही हॉटेल चालक आपल्या व्यवसायासाठी व्यवसायिक गॅस सिलिंडर ऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरत असल्याची माहिती जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला मिळाली होती. त्या माहितीवरून आज दि.18 मंगळवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने कारवाई करून 17 घरगुती वापराचे गॅस सिलिंडर जप्त केलेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात घरगुती गॅस सिलिंडर वापरणार्‍या 9 हॉटेल चालकांवर कारवाई संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती जालना तहसीलदार छाया पवार यांनी दिली.

या कारवाई मध्ये तोरणा अमृततुल्य, पंकज बुंदे, कल्पना रेस्टाँरंट, रामा हाटेल, मदिरा बार अँन रेस्टारेंट, राम टकले, हाटेल दुर्वांकुर, कन्हैया डोसा सेंटर, आईसाहेब भोजनालय आदी आस्थापनेवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई तहसीलदार छाया पवार, प्रकाश जाधव (निरीक्षण अधिकारी), शाम सपाटे (पुरवठा निरीक्षक), भावना घुसे (पुरवठा निरीक्षक), विशाल लताड (महसूल सहायक), दिलीप मुळे आदींच्या वतीने करण्यात आली. या कारवाईने घरगुती गस सिलेंडर वापरणार्‍या व्यवसायिकांचे धाबे दणाणले.  

Related Posts

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन