माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास

सर्वच तांड्यातील समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार -अर्जुन नायक राठोड अर्जुन राठोंडच्या उपस्थितीत पार पडली बैठक

परतुर । प्रतिनिधी - जिल्ह्यातील लमान तांड्यांना सुख सुविधांनी समृध्द करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या असुन  त्याच अनुषंगाने आज अशासकीय सदस्य अर्जुन नायक राठोड यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकार्‍यांसह ग्रामपंचायतच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक पार पडली, यावेळी बंजारा बांधवांच्या विविध समस्या आणि समृध्दी बाबत अर्जुन नायक राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून बंजारा बांधवांना समृध्द करण्यासाठी जे जे प्रश्‍न आहेत, ते मांडून बंजारा समाजाचे असलेले विविध प्रश्‍न मांडून संबंधीतांचे लक्ष वेधून त्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार हेच दाखवुन दिले आहे.
 
पंचायत समिती परतूर येथे संत सेवालाल महाराज बंजारा, लमान तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांड्याना महसूली दर्जा देऊन ग्रामपंचायत निर्माण करण्या संबंधी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अर्जुन राठोड अशासकीय सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय जालना परतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, श्री . राजेश तांगडे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी,  उपस्थित होते. या बैठकीस तालुकास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य श्री नवनाथ आढे , अनिल राठोड , कैलास चव्हाण , यांच्या सह समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते, या वेळी मा जिल्हाधिकारी महोदयानी दिलेल्या 28 मार्च या अंतिम तारखेच्या पूर्वी, परतूर तालुक्यातील सर्व प्रस्ताव तयार करून जिल्हा समितीकडे सादर करण्या संबंधी सूचना यावेळी गटविकास अधिकारी परतूर यांनी सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. 
 
 

Related Posts

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन