पनवेल
पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.
वलप गाव येथे राहणारे अमरावती रामकरण भारद्वाज (वय 50) यांच्या बाबाचा ढाब्याजवळ आरोपी विशाल भाऊसाहेब सगलगिले (वय ४३) हा आला व त्याने पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करून तो पसार झाला याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिरुद्ध गिजे, पो उपनी राजपूत, पोहवा/धुमाळ , पोहावा तांडेल, पोहवा कुदळे, पो हवा बाबर, पोहवा देवरे, पोहावा म्हारसे,पोलीस शिपाई भगत, पोलीस शिपाई खताळ आदींच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळा जवळील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तसेच रेकॉर्डवरील आरोपीत यांचा गुन्हे अभिलेख तपासून त्याच्या आधारावर संशयित आरोपींचा पाठपुरावा केला असता तळोजा एमआयडीसी येथील गुप्त बातमीदार मार्फत आरोपीं बाबतची माहिती प्राप्त करून, आरोपींचे लोकेशन घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी यांना तळोजा एमआयडीसी या ठिकाणावरून ताब्यात घेउन पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरचा आरोपी हा सराईत असून त्याच्यावर इतर 3 पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे पुढील तपास करीत आहेत.
