आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित
जालना । प्रतिनिधी - राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा असलेली घडामोड अखेर स्पष्ट झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल 31 जुलै रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. सेठ जिथं, आम्ही तिथं! असा निर्धार काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनी केल्याने हा राजकीय प्रवेश अधिकच गाजणारा ठरणार आहे.

भाजप प्रदेश कार्यालय, मंत्रालय, मुंबई
दिनांक 31 जुलै 2025, दुपारी 3 वाजता
या प्रवेशप्रसंगी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश जालना जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना मोठा धक्का देणारा असणार आहे, विशेषतः काँग्रेससाठी ही मोठी पोकळी निर्माण करणारी घटना ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
काँग्रेससाठी झटका, भाजपसाठी बळकटी
गोरंट्याल हे जालना शहरातील प्रभावशाली नेते असून त्यांनी दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. स्थानिक प्रश्नांवर त्यांची भूमिका आक्रमक आणि स्पष्ट राहिलेली आहे. अशावेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

About The Publisher
