जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

जालना | प्रतिनिधी -  जालन्याच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे, येत्या दोन तीन दिवसात गोरंट्याल हे अधिकृत रित्या भाजपची माळ गळ्यात घालणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास जालना महानगर पालिका निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

भाजपकडून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय

गेल्या आठवड्यात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत गोरंट्याल यांना जालना महानगरपालिकेतील भाजपच्या महापौरपदासाठी लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवरही चर्चा झाली असून, त्यांची स्वीकृती मिळाल्यास भाजपकडून ते महापौरपदाचे उमेदवार असतील.

खोतकर-गोरंट्याल संघर्ष तेज होणार?

Read More “दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ;  जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?

गोरंट्याल यांचे दीर्घकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आ. अर्जुनराव खोतकर हे आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत अनेक वेळा त्यांच्यात चुरस झाली आहे. काँग्रेसमध्ये असताना गोरंट्याल यांनी खोतकरांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. आता भाजप प्रवेशामुळे ही स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा थेट संघर्ष ठरण्याची शक्यता आहे.

Read More आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित

भाजप प्रवेशासाठी तयारी अंतिम टप्प्यात

भाजपकडून गोरंट्याल यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे जालना भाजपसाठी मोठे बळ मिळणार आहे.

जालना मनपा मैत्री पूर्ण लढतीचा असेल प्रस्ताव 

जालना महानगर पालिकेच्या येत्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे आग्रही आहेत. वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे जालनाकरांचे लक्ष्य लागून आहे.

आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या भूमिकेकडे लक्ष 

भाजपा शिवसेना यांची युती आहे अशावेळी कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातल्या त्यात भाजपा स्वबळावर आगामी जालना मनपा निवडणुक लढविणार अशी अट पक्षप्रवेशासाठी माजी आमदार गोरंट्याल यांची असल्याचे कळते. अशावेळी आमदार अर्जुनराव खोतकर काय भूमिका घेतात. हे ही लवकरच स्पष्ट होईल.

एकंदरीत कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश आणि महापालिकेसाठी उमेदवारी निश्चित झाल्यास, जालन्याच्या राजकारणात खळबळ उडणार आहे. हे स्थानिक आमदार खोतकर यांच्यासाठी मोठं आव्हान ठरू ठरणार की, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची गत ना घर का घाट का अशी होणार हे, पाहणे औचित्याचे ठरेल. 

Related Posts

LatestNews

विज्ञान संघटनेचे उद्घाटन आणि पोस्टर्सचे प्रदर्शन
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात २०२५ च्या शैक्षणिक प्रबोधन सप्ताहाची सांगता
पनवेल भगिनी समाज सामाजिक संस्थेची शतकपूर्ती
नेरे येथील गिरिजा आश्रम येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
सराईत रिक्षा चोर अक्षय चव्हाण गजाआड
आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित