सराईत रिक्षा चोर अक्षय चव्हाण गजाआड

दोन रिक्षा पोलिस ठाण्यात जमा

सराईत रिक्षा चोर अक्षय चव्हाण गजाआड

पनवेल

IMG-20250729-WA0025

 पनवेल परिसरात रिक्षा चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून चोरीतील दोन्ही रिक्षा हस्तगत केल्या आहेत.

पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटल समोरील रोडवर उभी करून ठेवलेली रिक्षा तसेच अशाच प्रकारे परिसरात उभी करून ठेवलेली रिक्षा आरोपी अक्षय चव्हाण (22 रा.पनवेल) याने चोरुन तो पसार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोहवा अविनाश गंथाडे, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, विनोद देशमुख, पोना सम्राट डाकी, पोशी चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना तो पनवेल परिसरात मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीच्या जवळपास 1 लाख रुपये किंमतीच्या दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

 

Read More आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित

Read More “दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ;  जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?

 

 

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

विज्ञान संघटनेचे उद्घाटन आणि पोस्टर्सचे प्रदर्शन
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात २०२५ च्या शैक्षणिक प्रबोधन सप्ताहाची सांगता
पनवेल भगिनी समाज सामाजिक संस्थेची शतकपूर्ती
नेरे येथील गिरिजा आश्रम येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
सराईत रिक्षा चोर अक्षय चव्हाण गजाआड
आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित