पनवेल
पनवेल तालुक्यातील नेरे येथील गिरीजा आश्रम येथून ७१ वर्षीय बबन मुकुंद बलाल हे कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
त्यांचा रंग सावळा, उंची १५५ सेंमी, केस बारीक, मिशी बारीक, समोरील वरचे भागातील दात पडलेला, उजव्या साईडच्या बाजूला अर्धांगवायू आहे. अंगात पिळव्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. त्यांना मराठी भाशा अवगत आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती आलस्यास त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोचवा अण्णासाहेब कोंडीबा हसबे मो नं ९८६७१३६८७६ येथे संपर्क साधावा.
