“दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ; जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?
जालना | प्रतिनिधी - जालना शहरात वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरून नागरिक अक्षरशः अंधारात रमले आहेत. एकीकडे महावितरणचे अधिकारी 'लाइनमध्ये आहे, साहेब' हेच पुन्हा पुन्हा सांगताना थकत नाहीत, तर दुसरीकडे आ. अर्जुनराव खोतकर यांनी दिलेला वीजदणका केवळ दोन दिवसांपुरताच प्रकाशमान राहिला.

खोतकरांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन – 48 तास?
महावितरणच्या कार्यालयासमोर दोन दिवस शांतता होती. तिसऱ्या दिवशी मात्र पुन्हा इन्व्हर्टर, जनरेटर, आणि मोबाईल फ्लॅशलाइट्सचा व्यापार सुरू झाला.
जुना जालन्यातील रेल्वे स्टेशन परिसर, तुळजाभवानी माता मंदिर परिसर, पुष्पक नगर यासह शहरातील इतर भागातही विजेचा लपंडाव सुरूच होता. एकप्रकारे मी भीत नाही कुणाला असाच काहीसा इशारा विजेने दिला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
जालन्याच्या जनतेला आता इतका अंधार सहन करावा लागतो की, ‘संध्याकाळ’ आणि ‘लोडशेडिंग’ याचं वेगळं अस्तित्वच उरलेलं नाही.
खोतकरांनी आता आणखी एक दणका दिला तर… तो किती तास चालतो, याची मॅरेथॉन मोजणी होणार!

About The Publisher
