खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य
जालना | प्रतिनिधी - जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बुधवार (२ जुलै) शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पालखी रथाचे बार्शी तालुक्यातील अरण येथे दर्शन घेतले आणि नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी त्यांनी नाथांच्या चरणी लीन होत भरपूर पाऊस पडू दे, बळीराजासह सगळी जनता सुखी राहुदे, असे साकडे घातले. व जालना लोकसभा मतदार संघातील वारीतील अनेक दिंड्यांना भेटी दिल्या. याप्रसंगी पैठणचे रविंद्र काळे, संदीप बोरसे, भाऊसाहेब जगताप, सदाशिव विटेकर, दिंडी चालक नाथ वंशज रघुनाथ बुवा गोसावी, योगेश बुवा गोसावी, पप्पुराज ठुबे, शिवाजी ढाकणे, भाऊसाहेब गवळी, सावता गाडेकर, कैलास वाघ, विठ्ठल कोरडे, संतोष मेटे, बाबुराव डकले, पंढरीनाथ जाधव, मुकेश चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव ,जयप्रकाश दादा चव्हाण, राम सिरसाठ, बाळासाहेब वाकुळणीकर, अरूण पैठणे, विजय गव्हाणे, गणेश कोळकरआदींची उपस्थिती होती.

About The Publisher
