अमरनाथ यात्रेला जालन्यातून भाविक रवाना
By Yuva Aadarsh
On
जालना - जीवनात एकदा तरी भगवान अमरनाथाचे दर्शन घ्यावे, असे प्रत्येक भारतीयाला वाटत असते. त्यामुळे बहुतांश जण काेणत्याही प्रकारे व अनेक अडचणींवर मात करून अमरनाथला जाऊन बाबा बर्फानीचे दर्शन घेतात. दरवर्षी जुलै महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू हाेते. त्यानुसार या वर्षी ३ जुलैपासून ही यात्रा सुरू होणार असून, ती येत्या ९ ऑगस्ट श्रावण पाैर्णिमेपर्यंत चालेल. ३८ दिवस चालणाऱ्या या यात्रेत आतापर्यंत ३.३० लाख भाविकांनी अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. अशा या यात्रेसाठी शहरातील एच.के.क्रिकेट क्लबचे हर्षित काबरा,विनय तापडिया,गणेश काबरा,गोविंद श्रीमाली,यश बांगड,देवांश गिल्डा हे (दि.२) बुधवार रोजी रवाना झाले आहे. यावेळी यात्रेसाठी रवाना होणाऱ्या भाविकांना एच.के.क्रिकेट क्लबच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Publisher
