अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा   अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

जालना । प्रतिनिधी - शहरातील फुलबाजार ते मोती मस्जिद मामा चौक कडे जाणार्‍या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा अशी मागणी मोती मस्जिद व फुलबाजार परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. तात्काळ रस्ता मोकळा न केल्यास येत्या पंधरा दिवसांनंतर रास्ता रोको आंदोलनचा ईशाराही देण्यात आला आहे. 

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुल बाजार ते मोती मस्जिद मामा चौक कडे जाणार्‍या मार्गावर नेहेमी वाहतुकीचा खोळंबा होतो. या मार्गावरील दुतर्फा असलेल्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर     फेरीवाले, गाडीवाले व ईतरांना जागा देऊन रस्त्याची रुंदी कमी केलेली आहे. त्यातच खरेदीसाठी येणार्‍यांची वाहने ही रस्त्यातच लावली जात आहे. एकप्रकारे अतिक्रमण करुन व्यवसाय करण्यात येत आहे. याबाबीकडे जालना शहर महानगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व वाहतुक शाखेचे अधिकारी-कर्मचारी हे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. यापुर्वी देखील या संदर्भात विविध तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याचा कोणतीही दखल अद्याप पर्यंत घेण्यात आलेली नाही. तात्पुरती दिखाव्यासाठी कारवाई केली जाते आणि पुन्हा परिस्थिती जैसै थे होते. या मार्गावरून मार्गक्रमण करतांना या भागातील नागरिकांसह इतर वाहनधारकांना त्रास होतो आहे. तसेच वाहतुकीच्या खोळंब्यामुळे हॉर्न आणि गाड्यांचे आवाज परिसरातील नागरिकांना बधिर करण्यागत होत आहे. 
मोती मस्जिद येथे मुस्लीम समुदाय सामुहिक नमाज पठणासाठी नियमित येतात. यांना देखील या बाबींचा त्रास होतो आहे. तेथे पार्किंगची व्यवस्था नाही. मस्जिद समोर असलेल्या स्व. स्वातंत्र्यसेनानी अब्दुल रहेमान कुरैशी चौक आहे. या ठिकाणीही अतिक्रमण करण्यात आलेले आहे. 

फुल बाजार ते मोती मस्जिद मामा चौक कडे जाणार्‍या मार्गावरील व स्व. स्वातंत्र्यसेनानी अब्दुल रहेमान कुरैशी चौक परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे. व नेहेमीकरता रस्ता मोकळा करण्यात यावा. व जालना शहर महानगर पालिका स्वच्छता निरीक्षक व वाहतुक शाखेचे अधिकारी-कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याशिवाय या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कठोरात कठोर पाऊले उचलण्यात यावे. यासाठी मनपा आयुक्त व शहर वाहतुक शाखेस योग्य त्या सुचना देण्यात याव्यात व भविष्यात या मार्गावर पुन्हा अतिक्रमण करुन रस्त्याची रुंदी छोटी करण्याचा प्रयत्न केल्यास मनपा प्रशासन व वाहतुक शाखेस दोषी धरुन जबाबदार अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन तातडीने कारवाई करावी अन्यथा पंधरा दिवसांनंतर रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. 
निवेदनावर फुलबाजार व मोती मस्जिद परिसरातील सर्व नागरिक तसेच व्यवसायिक मोती मेडीकल, अजंठा रेस्टारंट, सारा रेडीमेड, आरजी मोबाईल, महाराज शूज, पटेल शूज, लाट सहाब, नवाब शूज, आँचल, चौधरी कलेक्शन, महाराजा चष्मा घर, डिलक्स ब्रेड, अक्सा मेडीकल, भारत वॉचेस, श्रीमान श्रीमती, हिंद वॉचेस, गुरू रेडीमेड, समिर कॉम्पलेक्स, मो अब्दुल सत्तार डिंगोरा, सय्यद नजीर सय्यद युनुस, सय्यद फेरोज जागीरदार, सय्यद अशपाक सय्यद इशाक, नूर मोहम्मद खान, शेख मोजीब शेख दादामियाँ, शेख हबी शेख दादामियाँ, शेख अमिर अहेमद, अब्दुल अलिम साहा, अमीत रजा साहा, निसार ईसाक बागवान, इब्राहीम अहेमद शाह, मुनव्वर अली, ताहीर अली, एकबाल, समीर खान, फरहान खान, मो असलम मो उस्मानियाँ, परवेज आलम, फुसान कुरैशी, शेख नबी, शाहरूख सय्यद अलिम, आकाश देवावाले, हनीफ कुरैशी, सद्दाम शेख, फेरोज सय्यद, असलम खान, शाहेद खान, सय्यद रहेमान, अफरोज खान, रमेश तनपुरे, कृष्णा मिटकर, राहुल राऊत, संजय राऊत, बबलु खान, अकबर खान आदी शेकडो साक्षर्‍या आहेत. 

Read More अमरनाथ यात्रेला जालन्यातून भाविक रवाना

LatestNews

खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य
अमरनाथ यात्रेला जालन्यातून भाविक रवाना
अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा
आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज
धुळ्यातील प्रकरणावर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ
अमान्य... मान्य... अमान्य... आवाज अन् गोंधळात शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा गुंडाळली; विद्यमान संचालकांचाही काही ठरावांना विरोध; सभेचा केला निषेध; अध्यक्षांनी आरोप फेटाळले
सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार