कलर मराठीवरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपुर दिसणार दमदार भुमिकेत!

कलर मराठीवरील कस्तुरी मालिकेत आशु सुरपुर दिसणार दमदार भुमिकेत!

जालना – आपल्या अभिनयाने वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार्‍या आशु सुरपुर आता कलर मराठीवरील कस्तुरी या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतील तीची भुमिका […]

जालना – आपल्या अभिनयाने वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार्‍या आशु सुरपुर आता कलर मराठीवरील कस्तुरी या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतील तीची भुमिका ही दमदार आहे. आतापर्यंत आशु सुरपुर हिने वीस पेक्षा अधिक मालिकांमध्ये काम केलेले आहे.
कस्तुरी मालिकेबद्दल बोलतांना आशु सुरपुर हिने सांगितले की, मालिकेत तिच्या बरोबर शिल्पा कुलकर्णी आहे. दीपक नलावडे या मालिकेचे डायरेक्टर आहेत. तर सुनिल कुलकर्णी कार्यकारी निर्माते आहेत. आपल्या जीवनाबद्दल बोलतांना आशु सुरपुर ही भावूक झाली होती. विविध मालीकेतून आपल्या समोर आलेली आशु आईच्या निधनानंतर पूर्ण खचुन गेली होती. पण तिची जिद्द आणि संधी तीला सोडायची नव्हती. तीला देण्यात आलेल्या या संधीबद्दल तीने निर्मात्यांचे आभार व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रातील मित्र-परिवार व सर्वांनीच ही मालिका पहावी आवाहनही तिने केले. कलर मराठीवर उद्या (26 जून) पासून रात्री 10.30 वा. कस्तुरी मालिका दाखविण्यात येणार असल्याचे तीने सांगितले आहे.

Related Posts

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन