जालना झाली ’सेल्फी सिटी’: कैलास गोरंट्याल यांच्या भव्य प्रवेशाने शहर भाजपामय; ’न भूतो न भविष्यती’ अशी स्वागत रॅली!
दीपक शेळके
जालना । - राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशाचे वारे वाहत असताना अनेक नेते एका पक्षातून दुसर्या पक्षात जात असल्याचे चित्र अवघा देश पाहतो आहे. मात्र, आज शनिवार (दि 2) रोजी जालना शहराने एका अभूतपूर्व आणि अविश्वसनीय अशा सोहळ्याची अनुभूती घेतली. दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे जालना शहरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण शहरात उत्साह संचारला होता आणि त्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर जालना शहर खर्या अर्थाने ‘सेल्फी सिटी’ बनल्याचा अनुभव जालनेकरांनी घेतला. अशा पद्धतीने जंगी स्वागत यापूर्वी कुण्या नेत्याचे झाल्याचे ऐकीवात अथवा पाहण्यात नाही; ही खर्या अर्थाने ‘न भूतो न भविष्यती’ अशी स्वागत रॅली ठरली!
https://www.instagram.com/reel/DM3IZX0Mo4Y/?igsh=MnJjNHZwa21iaXJv

‘सेठ जिथं, आम्ही तिथं’ - जालनेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रँड एन्ट्री, फुलं, फ्लॅश अन् फॉलोअर्सचा जल्लोष
रॅली मार्गावर ठिकठिकाणी कैलास गोरंट्याल यांचे औक्षण करण्यात आले, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, डीजे आणि बॅण्डच्या दणदणाटाने वातावरण भारून गेले होते. फुलांची उधळण करून आणि हार घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या या ‘ग्रँड एन्ट्री’ने आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने शहर पूर्णपणे भाजपामय झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. या रॅलीत जालण्यातील भाजपामध्ये गेलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक, भाजपाचे माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेकांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही, त्यामुळे खरंच जालना आज ‘सेल्फी सिटी झाली रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली. गोरंट्याल यांच्याकडे असलेला हा जनसंपर्क आणि लोकप्रियता भाजपसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्यांच्या या जोरदार प्रवेशाने भाजपला जालना जिल्ह्यात अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Publisher
