जय माताजी महिला भजन मंडळातर्फे नवरात्र उत्सवात भक्तिभावाने भजन सेवा
On
पनवेल – शैलेश जोशी

भक्तिभावाने वातावरण भारले गेले आणि उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जय माताजी महिला भजन मंडळ गेली दहा वर्षांपासून सातत्याने भजन सेवा देत असून, भजनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान देत आहे. या मंडळाने सार्वजनिक गोशाळांमध्ये गायींसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देणगीच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे, तसेच इतर सामाजिक उपक्रमांमध्येही सहभाग घेतला आहे.
या मंडळात मंजू कालोर, मधु परमार, जसोदा कुमावत, निमा वैष्णव, नीलम वैष्णव आणि इतर अनेक भगिनी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात आध्यात्मिकतेसोबतच सेवा भावनाही दृढ होत आहे.

Tags:
About The Publisher
