जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील झोपडपट्टी निवासी नागरिकांचे अनेक घर उद्ध्वस्त झाले. यामुळे गोरगरीब, मोलमजुरी, छोटे व्यापारी यांचे घर व सामग्री मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहर उपाध्यक्ष तय्यब बापु देशमुख यांनी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्याकडे निवेदन करून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
झोपडपट्टीतील पुनर्वसन आवश्यकता, मुसळधार पावसामुळे झोपडपट्टी निवासी अनेक नागरिकांचे घर उद्ध्वस्त झाले., शासनाकडून पुनर्वसन सहायता देण्यात यावी, अशी विनंती.
महानगरपालिकेची नाले व्यवस्था अपुरी:
शहरातील सांडपाणी जाण्यासाठी नाले व नाल्यांची माहिती महानगरपालिकेकडे नाही. काही वर्षांपूर्वी जुन्या नाल्यांच्या जागी अंडरग्राऊंड पाईप लाईन बसवण्यात आली, पण सांडपाणी प्रेशात जात नाही; पाईप पटकन चौकप होतात. काही झोपडपट्टींमध्ये खदानी असल्याने पाईपातून पाणी उलट घरात शिरते. महानगरातील काही भागांमध्ये 2-3 दिवस पाऊस चालू राहिला, तर शहर जलमय झाले.
दुर्दशेतले महत्त्वाचे इमारती व पूल:
फुलंब्री नाट्यगृहाची स्थिती बिकट; दुरुस्ती करण्याची आवश्यकता., लकडकोट पुल नादुरुस्त; संभाव्य धोकादायक, नवीन पुल करणे गरजेचे., बसस्थानकाजवळील पुल उंच करावा, रामतिर्थ स्मशानभूमीचा पुल दुरुस्त करावा.
पाणी टाकी आणि आरोग्य:
पाणी टाकीवर ढापे नसल्याने घाण जमते; नागरिकांचे आरोग्य धोक्यात., विसावा शाळा नूतनवहसात पीण्याच्या टाकीत युवकाचा मृत्यू; 20 हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
महानगरपालिकेच्या प्रशासनातील कमतरता: नाले, महावीर मंगल कार्यालय, कोंडवाडा, दर्गा माहीत नसणे. शहरातील जुन्या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती असूनही प्रशासन योग्य व्यवस्था करू शकत नाही.
जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांना बारकाईने लक्ष देऊन जालना महानगरातील नाले, पाईपलाईन्स, पुल आणि इतर इमारतींचा आढावा घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देणे.

शहरातील नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी सांडपाणी विसर्जनाची सोय सुनिश्चित करणे.
शहरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचे संरक्षण करणे.

Tags: tayyab deshmukh
About The Publisher
