मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी - अर्जुननगर येथील जॉन्सन पाखरे यांच्या मालकीच्या रिकाम्या प्लॉटवर पावसामुळे पाणी साचले. या पाण्याचा निचरा करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने नागरिकालाच 1 लाख 15 हजार रुपयांचा खर्च दाखवून त्याची भरपाई करण्यासाठी नोटीस पाठवली. या तुघलकी निर्णयामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आयुक्तांच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे.
आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून
महानगर पालिका झाल्यानंतर नागरिकांकडून वसुलीचा सपाटा लावला जात आहे. नुकतेच मनपा प्रशासनाने अनाधिकृत नळ कनेक्शनसाठी तिर्हाईत मार्फत नोटीसा पाठवून दहा हजारांची वसुलीच्या माध्यमातून कोटींचा कर वसुल केला. त्यानंतर आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सामान्य नागरिकांकडून भरपाई पोटी नोटीसा पाठविल्या आहेत. केवळ पाखरे यांनाच मनपा ने नोटीस पाठविली की, अन्य इतरांनाही नोटीसा पाठविण्यात आला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, जर मनपा अशाच पद्धतीने कारभार करणार असेल. तर मनपा ऐवजी जालना ही नगर पालिका बरी होती असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आता आली आहे. मनपाने सुविधा पुरविण्यावर भर देणे गरजेचे आहे. नगर रचनाकार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या हलगर्जीपणामुळे जालनेकरांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ती भरपाई खरे तर जालना शहर महानगर पालिकेेने देणे आवश्यक आहे. मनपाच्या आयुक्तांपासुन जबाबदार विभाग प्रमुख व स्वच्छता निरीक्षकांच्या संपत्ती जप्त करुन जालनेकरांच्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे. मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून.

शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या या कारभाराची निजामी वसुली अशी तुलना केली. सेवा देण्याऐवजी सामान्यांना त्रास देणारे आदेश काढले जात आहेत, अशी टीका होत आहे.
महापालिका नागरिकांची सेवा करते की खंडणी वसूल करते? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेतून प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महापालिकेने तातडीने नोटीसा मागे घेऊन पाखरे यांना मदत करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.

About The Publisher
