पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - मागील काही दिवसांपासून जिल्हाभर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून जिल्ह्यासह जालना शहरातील नागरिकांचे
जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतांना आज २७ सप्टेंबर रोजी पुन्हा हवामान खाते व प्रशासनाच्या वतीने पुढील दोन दिवसांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभुमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी जनतेच्या काळजीपोटी नागरिकांना अतिवृष्टीपासून सतर्क करण्यासाठी जालना शहरात दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना खबरदारीच्या सुचना दिल्या.

About The Publisher
