जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पनवेल मधील रुद्राणी पाटीलला तीन सुवर्णपदक
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद व महेश बालदी मित्र मंडळ, उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन
पनवेल:

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उरण नगरपरिषद व महेश बालदी मित्र मंडळ, उरण यांच्या संयुक्त विद्यमानाने या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून वयोगट 6 ते 60 वर्षां खालील अनेक जलतरणपट्टूनीं सहभाग घेतला होता.या स्पर्धेत कुमारी रुद्राणी परेश पाटील हिने 8 वर्षांखालील गटांमध्ये अप्रतिम कामगिरी करून आपले कौशल्य सिद्ध केले.तिच्या या कामगिरीबद्दल तिला 3 सुवर्ण पदके व 1 कांस्य पदक तसेच चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली.रुद्राणीच्या या उत्तुंग यशामध्ये तिचे प्रशिक्षक समर्थ नाईक व सुजल मढवी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उत्तुंग कामगिरीमुळे पनवेल मधील कल्पतरू सोसायटी तिचे मूळ गाव खोपटे मध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

About The Publisher
