जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी दि.22 रोजी कार्यशाळा; कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांसाठी दि.22 रोजी कार्यशाळा; कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन

जालना - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आज मंगळवार, दि.22 जूलै, 2025 रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात सकाळी 10 वाजता ही कार्यशाळा होणार आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटन सोहळ्यास पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता तसेच सायबर सुरक्षा, ताणतणाव व्यवस्थापन तसेच अधिस्विकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी  या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेस जालना जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, संपादक आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे. 

 

Read More आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित

Tags: DIO jalna