जालना शहर मनपा ‘अति’...‘रिक्त’ आयुक्तच...

जालना शहर मनपा ‘अति’...‘रिक्त’ आयुक्तच...

जालना । प्रतिनिधी - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची गुरुवार (दि 20) रोजी जयंती साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धकृती पुतळा बसविणे व बस स्थानक- छ. संभाजीनगर या मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे शिष्टमंडळ महानगर पालिकेत गेले. मा. आयुक्त उपस्थित नसल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्याच्या मानस होता. मात्र, या अतिरिक्त आयुक्त महोदयांकडे निवेदन स्विकारण्यासाठी वेळ नसल्याचे कळाले, त्यामुळे ओएस विजय फुलंब्रीकर यांना निवेदन देण्यात आले. 

मुळात जालना महानगर पालिका अतिरिक्त आयुक्तांचे नेमके कार्य काय? याचा बोध अद्यापपर्यंत जालनेकरांना झालेला नाही. यापुर्वी देखील समााजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नागरिकांसोबतच्या अरेरावीच्या भाषेबद्दल रोष व्यक्त केलेला आहे. सामान्य व गोर गरीब नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे. धनदांडग्यांवर कारवाई का करत नाही? हे अनुत्तरीत आहे. शहर विद्रुपिकरणात भर घालणार्‍या अनाधिकृत जाहीरातबाजींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिकृत करण्यावर मनपाचा भर का आहे? शहरातील विविध बायपास व कॉलनीला लागून असलेले अंतर्गत रस्ते तसेच छत्रपती संभाजी नगर रोड - भोकरदन नाका - बसस्थानक यासह मंठा चौफुली, अंबड चौफुली, राजुर रोड, कन्हैय्यानगर- देऊळगाव राजा रोड या महामार्गावरील अंतर्गत रस्त्यांचे काय? याचा रेकॉर्ड मनपाकडे नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

अतिरिक्त आयुक्तांनी शहरातील अस्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करून शहर स्वच्छ करावे, घंटागाड्या किती सुरु आहेत, त्यासाठी त्यावर होणारा डिझेल व इतर खर्च किती होतो आहे. आयसीटी बेस प्रणालीच्या अनुषंगाने क्यु आर कोड घरीजावून स्कॅन केले जातात का? याकडे लक्ष द्यावे, शहरातील मनपाचे विविध ठिकाणी असलेले शॉपींग कॉम्पलेक्स किती वर्षांपासून आणि कुणाला लीज (भाडेतत्त्व) ने दिले याची चाचपणी करावी. आझाद मैदानजवळ असलेल्या शॉपींग कॉम्पलेक्सचा विचार केला तर अनेक गाळे भाडेतत्त्वावर कुणाला दिलेले आहेत याची नोंदच मनपाकडे नाही. या आणि यासह विविध समस्यांनी मनपाला घेरलेले आहे. यासारख्या गंभीर विषयाकडे मनपा अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे. कार्यालयात विविध मागण्या घेऊन आलेल्या सामान्य नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी अपेक्षा सामान्यांची असते.

वातानुकुलीत कॅबिनमध्ये बसून केवळ आणि केवळ आर्थिक हितसंबंध असलेल्यांनाच भेटायचे आणि इतर सामान्य नागरिकांना टाळायचे असाच काहीसा उद्योग तर मनपा अतिरिक्त आयुक्तांकडून होत नसेल ना? याची खातरजमा मनपा आयुक्तांने करणे गरजेचे आहे. मनपा अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांच्या पदाला साजेशे काम करणे अपेक्षित असतांना अल्पकालावधीतच त्यांच्यावर सामान्यांचा रोष वाढत आहे. मनपा ‘अति’...‘रिक्त’ आयुक्तच...अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही बाब मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेला साजेशी नाही. याबाबीकडे मनपा आयुक्तांसह जिल्हाधिकारी यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read More ‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन