जालना | प्रतिनिधी- जालना शहरातील कालिंका स्टील गणेश मंडळातर्फे यंदाही भक्तिभावाने गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. मंडळाच्या वतीने सोमवारी गणेश मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
गणपतीची आरती कालिंका स्टीलचे संचालक मा. घनश्यामजी गोयल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात मंगलमय वातावरण निर्माण केले.
या प्रसंगी अरुण शेठ अग्रवाल, अनुज बंसल, अनिल गोयल, यश गोयल, गोपाल सेठ गोयल, गोविंद गोयल, मनोज जिंदल व आदित्य जिंदल यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होती. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंडळात भाविकांची गर्दी झाली असून, आकर्षक सजविण्यात आला आहे.
भक्तीमय वातावरणात झालेल्या गणेश मूर्ती स्थापनेने गणेशोत्सवाचा मंगलारंभ झाला असून, पुढील दहा दिवस जालना शहरातील गणेशभक्तांसाठी हा उत्साहाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.