महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - जालना येथील युवा उद्योजकांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोठे पाऊल उचलले आहे. नवी मुंबई येथे उच्च क्षमतेचे, हरित प्रमाणित आणि ऊर्जा कार्यक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या कराराअंतर्गत, कंपनीद्वारे परकीय थेट गुंतवणुकीसह एकूण ₹१२,५६४ कोटींची गुंतवणूक होणार असून, सुमारे ११०० पेक्षा अधिक नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळून डेटा सेंटर क्षेत्रात जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा राहणार आहे.
जालना येथील सुप्रसिद्ध उद्योगपती सतीश काश्मिरीलाल अग्रवाल व त्यांचे सुपुत्र आदित्य अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम आहे. या ऐतिहासिक करारानिमित्ताने जालना महानगर भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते चित्रकूट निवासस्थानी अग्रवाल परिवाराचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, उद्योगपती अर्जुन गेही, भाजप जालना महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Publisher
