‘सीमाएं सिर्फ दिमाग में होती हैं, उम्र में नहीं’; 80 व्या वर्षी एव्हरेस्ट आणि 79 व्या वर्षी अन्नपूर्णा सर करणारे सत्यदेव वर्मा
‘माणसाने एकदा मनात ठरवले की, तो काहीही करू शकतो.’ हे वाक्य तंतोतंत खरे करून दाखवले आहे ज्येष्ठ गिर्यारोहक सत्यदेव वर्मा यांनी. वयाच्या 79 व्या वर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्प आणि 80 व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांनी हे सिद्ध केले आहे की, ‘वय’ हा केवळ एक आकडा आहे. याच धाडसी अनुभवावर आधारित त्यांची ही खास मुलाखत.

सत्यदेव वर्मा: मी अन्नपूर्णा बेस कॅम्प 24 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प 14 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत पूर्ण केला.
सत्यदेव वर्मा: हिमालय ही एक विशाल पर्वतशृंखला आहे. जगातील सर्वात उंच शिखर ‘एव्हरेस्ट’ याच शृंखलेत येते. पूर्वी याला ‘सागर माथा’ म्हणायचे, पण ब्रिटिश लोकांनी याला ‘एव्हरेस्ट’ असे नाव दिले. एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची 5364 मीटर आहे, तर अन्नपूर्णा कॅम्पची उंची 4130 मीटर आहे. त्यामुळे एव्हरेस्ट कॅम्पची उंची जास्त आहे. मात्र, अन्नपूर्णाचा ट्रेकिंग मार्ग एव्हरेस्टपेक्षा अधिक कठीण आहे. म्हणूनच इथे कमी पर्यटक येतात.
प्रश्न: तुम्हाला ट्रेकिंग करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
सत्यदेव वर्मा: माझे पुण्यातील मित्र कुंज टीबरेवाल हे याआधी जाऊन आले होते. त्यांनी मला त्यांचे फोटो पाठवले. ते पाहूनच मी ठरवले की, मी सुद्धा हे ट्रेकिंग करेन.
प्रश्न: एवढ्या मोठ्या शिखरांवर जाऊन तुम्हाला कसा अनुभव आला?
सत्यदेव वर्मा: एव्हरेस्ट पूर्ण करून आल्यावर मला जाणवले की माझे वय 5 वर्षांनी कमी झाले आहे. आणि अन्नपूर्णा पूर्ण केल्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी वय कमी झाल्यासारखे वाटले. या अनुभवांमुळेच मी आता ठरवले आहे की, आयुष्यात दरवर्षी वेगवेगळे ट्रेकिंग पॉईंट पूर्ण करायचे आणि सर्व 18 पॉईंट्स पायीच सर करायचे.
प्रश्न: तुमच्या टीममध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य कोण होते?
सत्यदेव वर्मा: दोन्ही ट्रेकिंगमध्ये सर्वात जास्त वयाचा मीच होतो. एव्हरेस्ट कॅम्पमध्ये माझ्यासोबत 18 वर्षांचा एक तरुण मुलगा होता, तर अन्नपूर्णा कॅम्पमध्ये सर्वात कमी वयाचा सदस्य 22 वर्षांचा मुलगा होता. आमच्यासोबत काही महिला सदस्यही होत्या.
प्रश्न: तुमच्या कुटुंबाने या ट्रेकिंगला संमती दिली होती का?
सत्यदेव वर्मा: माझा मुलगा अरविंद लॉस एंजेलिसमध्ये राहतो, सून शुभी पुण्यात आहे. मुलगी मनीषा आणि जावई पराग पुण्यातच आहेत. सुरुवातीला माझ्या मुलाने माझ्या जाण्याला तीव्र विरोध केला होता, पण मी ठाम होतो आणि गेलो. 26 एप्रिल 2025 रोजी मी सुखरूप परतलो, त्याच दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस होता. तो म्हणाला, तुम्ही माझ्या वाढदिवसाला सुखरूप परत आलात, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. नंतर दुसर्या ट्रेकसाठीही त्याने विरोध केला, कारण तो मार्ग खूप अवघड होता, पण मी ऐकले नाही आणि सुखरूप परतलो.
प्रश्न: या वयात एवढी मोठी ट्रेकिंग करताना तुम्हाला भीती वाटली का?
सत्यदेव वर्मा: नाही, मला अजिबात भीती वाटली नाही. मी आधीच चालायचा आणि धावण्याचा भरपूर सराव करून गेलो होतो.
प्रश्न: वाचकांना तुमचा काय संदेश आहे?
सत्यदेव वर्मा: माझा संदेश हाच आहे की, माणसाने एकदा मनात ठरवले की तो काहीही करू शकतो. सीमाएं सिर्फ दिमाग में होती है, उम्र में नहीं कारण, वय हा फक्त एक आकडा आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही एकदा हिमालयावर जाऊन एक अविस्मरणीय अनुभव घ्यावा आणि आपला आत्मविश्वास हिमालयाएवढा वाढवावा. ज्यांना या संदर्भात मार्गदर्शन हवे असेल, ते माझ्याशी 9881744069 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

About The Publisher
