महाबोधी बुध्दविहार मुक्ती साठी निघालेल्या पंचशिल धम्म ध्वज यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत; मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान काढली पद यात्रा

महाबोधी बुध्दविहार मुक्ती साठी निघालेल्या पंचशिल धम्म ध्वज यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत; मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान काढली पद यात्रा

जालना | प्रतिनिधी -   महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांनी काढलेली पंचशील धम्म ध्वज जनसंवाद यात्रा ही शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल झाली. दरम्यान या यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत करण्यात आले. दुपारी 1 वाजता निघालेली पदयात्रा ही मंठा चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाणी वेस, मस्तगड येथे दाखल झाली. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅली गांधी चमन, शनिमंदीर मार्गे अंबड चौफुली येथे 4 वाजेच्या सुमारास दाखल झाली.

सदरील यात्रा ही अंबड चौफुली येथे आल्यानंतर गायत्री लॉन्स येथे रॅलीची जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी यात्रेतील सहभागी भिख्खू संघाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. बिहार मधील महाबोधी महाविहार मुक्ती च्या समर्थनार्थ जनसंवाद पंचशिल धम्म ध्वज यात्रा दि. 16 ऑगस्ट 2025 पासून नागपूर येथून सुरु करण्यात आली असून ती चैत्यभूमी मुंबई येथे जाणार आहे.

4c2f21bd-bc45-4682-b2ef-19a1c6594362

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तसेच बीटी अ‍ॅक्ट 1949 रद्द करणे ही मागणी घेऊन ही धम्म ध्वज, जनसंवाद यात्रा भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. ही यात्रा शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात शासकीय विश्रामगृह, अंबड चौफुली येथे मुक्कामी थांबणार असून ती दुसर्‍या दिवशी रवाना होणार आहे. यावेळी गायत्री लॉन्स येथे मोठ्या प्रमाणात उपासक, उपासीकांची उपस्थिती होती.

Read More श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण

 
 

LatestNews

श्रेयाचे राजकारण; मराठा आंदोलन आणि राजकीय बाजारीकरण
राजेहो तुमच्या पाठिंब्याने जिंकलो - मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय जारी... जशाचा तसा शासन निर्णय येथे वाचा...
जालना येथील कालिंका स्टील गणेश मंडळात श्री गणेश मूर्तीची स्थापना
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा ; असलम कुरैशी यांच्या शिष्टमंडळाने घेतली मराठा योद्धा जरांगे पाटील यांची भेट 
महाबोधी बुध्दविहार मुक्ती साठी निघालेल्या पंचशिल धम्म ध्वज यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत; मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान काढली पद यात्रा
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार
कलकत्ता येथील परिषदेत जालना येथील 'कालिका स्टील्स' चे संचालक गोविंद गोयल यांना 'वक्ता' म्हणून सन्मान