पाव्हणं जेवलात का… फेम राधा खुडे यांचा बहारदार कार्यक्रम; साहित्यरत्न फेस्टिवलच्यावतीने आयोजन

पाव्हणं जेवलात का… फेम राधा खुडे यांचा बहारदार कार्यक्रम; साहित्यरत्न फेस्टिवलच्यावतीने आयोजन

जालना । प्रतिनिधी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने यंदा साहित्यरत्न फेस्टिवलच्यावतीने 2 ऑगस्ट रोजी :पाव्हणं जेवलात का’ व ’पाटलांचा बैलगाडा’ फेम सुप्रसिद्ध गायिका राधा […]

जालना । प्रतिनिधी – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने यंदा साहित्यरत्न फेस्टिवलच्यावतीने 2 ऑगस्ट रोजी :पाव्हणं जेवलात का’ व ’पाटलांचा बैलगाडा’ फेम सुप्रसिद्ध गायिका राधा खुडे यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित या फेस्टिवलचे यंदा दुसरे वर्ष आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती देताना सांगितले की, शहरातील मातोश्री लॉन्स येथे 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेला आयोजित या संगीतमय कार्यक्रमाचे उदघाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्ष म्हणून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर उपस्थित राहणार आहे. साहित्यरत्न फेस्टिवलची सन 2023 मध्ये संस्थापक मार्गदर्शक सुनील आर्दड यांच्या नेतृत्वात स्थापणा करण्यात आली असून गत वर्षी साजन बेंद्रे यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. 2 ऑगस्ट रोजी होणार्‍या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा. कल्याण काळे, आ. राजेश टोपे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, माजी आ. अरविंदराव चव्हाण, आ. संतोष दानवे, माजी आ. संतोष सांबरे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, पोउप अधीक्षक अनंत कुलकर्णी, भास्करराव अंबेकर, राजाभाऊ देशमुख, अशोक पांगारकर, भास्कर दानवे, भाऊसाहेब घुगे, डेव्हीड घुमारे, सुधाकर रत्नपारखे, राजेश राऊत, बबलू चौधरी, विष्णू पाचफुले, विनीत साहनी आदीचा समावेश आहे. सदरील कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या उद्योजक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत साहित्यरत्न फेस्टिवल समितीचे संकल्पक अंकुश राजगिरे, सचिव कल्पना त्रिभुवन, हिंदू महासभेचे धनसिंह सूर्यवंशी, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षीरसागर, छत्रपती फौंडेशनचे सुनील रत्नपारखे, व्हाईस ऑफ मीडियाचे राजेश भालेराव, अ. भा. पेशवा संघटनेचे अमित कुलकर्णी, सकल मारवाडी समाजाचे मनीष तवरावाला आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष सुनील आर्दड व संयोजन समितीने केले आहे.

Related Posts