राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करता आली हे माझे सौभाग्य - आ. बबनराव लोणीकर; श्री दत्त जयंती निमित्त ह भ प श्रीकृष्ण महाराज शिंदे शहापूरकर यांचे हरी किर्तन
परतूर । प्रतिनिधी - माझा जन्मच मुळात वारकरी संप्रदायातील कुटुंबात झाल्यामुळे माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार असून नित्य नियमाने पंढरीची वारी करणारी माझे वडील, यांच्यामुळे मी सांप्रदायाशी जोडल्या गेलो, आपल्याला 32 अभंग पाठ असून, आपण वेळ मिळेल तेव्हा नित्य नियमाने भजन पूजन करण्यासाठी घरच्या घरी का होईना वेळ देत असतो असे मत राज्याची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.
ads

पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी, सेवेचा वसा हाती घेऊन दलित पीडित, निराश्रीतांची सेवा करत गेलो, मुळातच धर्म संस्कृतीला जोपासणारी संस्कार माझ्यात असल्यामुळे माणसांना जोडत गेलो त्यातून समाजाला न्याय देऊ शकलो विकासाची अनेक कामे मतदार संघात करू शकलो असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
शत्रुघ्न कणसे व त्यांच्या परिवाराने त्यांच्या पाच पिढ्यापासून दत्त जयंतीची ही परंपरा सतत जोपासलेली असून कणसे परिवाराचे आपण अभिनंदन करत असून यापुढेही या परिवाराने धर्म संस्कृतीसाठी अशाच प्रकारचे उत्सव नियमितपणे आयोजित करावे असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी ह भ प श्रीकृष्ण महाराज शिंदे शहापूरकर यांनी हरी कीर्तनाच्या माध्यमातून, सेवा धर्म, प्रपंच आदी बाबींचा उहापोहो करत प्रपंच करत असताना देव देश आणि धर्मासाठी काम करण्याची आवाहन यावेळी उपस्थित त्यांना केले त्याचबरोबर जो राजसत्ता व धर्मसत्ता या दोन्ही चा मेळ घालतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो कारण राजशत्तेचा आश्रेय खूप गरजेचा असतो आणि आपण पाहतो की या भारत देशामध्ये कधी नव्हे ते रामराज्य अयोध्येतील श्री प्रभूराम यांचे मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून स्थापन झाले नारीशक्तीचा आवर्जून उल्लेख करताना महाराजांनी स्थैर्य लक्ष्मी ही केवळ नारीशक्तीमुळेच टिकून राहते असे सांगतानाच महिलांनी सासू सासरे कुटुंब यांची सेवा करावी असे यावेळी बोलताना सांगितले श्री लोणीकर हे येणार्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात उच्च पदावर राहतील असेही संकेत महाराजांनी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षातील सामाजिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील व्यापारी क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मंडळींची उपस्थिती होती.


About The Publisher
