पनवेल :

महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने वृक्षारोपण अभियान राबवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर विचुंबे रोडवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून त्यांनी यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि पनवेल महापालिकेच्यावतीने निसर्ग समृद्ध करणारे अभियान राबवल जात असल्याबद्दल त्यांचे आभार मानून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे रायगड अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद सावळेकर, संस्थापक अध्यक्ष राजेश प्रजापती, माजी अध्यक्ष महेश नागराजन, प्रोजेक्ट चेअरमन जयेश गांधी, उपाध्यक्ष हितेश गढिया, वैभव अग्रवाल खजिनदार प्रिया गुरूनानी, जॅाइंट सेक्रेटरी प्रशांत शेवडे, पीआरओ लक्ष्मण साळुंखे, यूथ अध्यक्ष जितेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य अनिरूद्ध सावळेकर, प्रतिक पोटे यांच्यासह पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ, तेजस कांडपीळे, प्रभाकर बहिरा, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, पनवेल महापलिकेचे उपायुक्त वैभव विधाते आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री रायगड असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रसिध्द निवेदक महेश गाडगीळ यांनी केले.