"तुमचं टाळकं ठिकाणावर आणलं आहे" – खोतकर यांची आक्रमक भूमिका; ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक
खोतकरांचा महावितरण कंपनीवर घणाघात; ठेकेदारांनाही झणझणीत फैलावर
ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक
जालना - जालना जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जोरदार फैलावर घेतले.

ऊर्जा राज्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना स्पष्ट सुनावणी
त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, प्रलंबित कामांमध्ये गती आणण्याचे आदेश दिले.
"फक्त फायलीत कामं नकोत, कृती हवी" – खोतकरांचा इशारा
“जनता अंधारात, आणि यंत्रणा फक्त फायलींमध्ये गढलेली आहे, हे आम्हाला मान्य नाही. जर काम करत नसाल, तर परिणाम भोगण्यास तयार राहा,” असा इशारा खोतकर यांनी दिला. यावेळी ठेकेदारांनाही फटकारत त्यांनी विकासकामांत पारदर्शकता व वेळेचे भान ठेवण्याचे निर्देश दिले.
ठळक मुद्दे:
-
महावितरणच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांनंतरही वीज समस्या सुटलेल्या नाहीत.
-
कामांमध्ये दर्जा, वेळ व पारदर्शकतेचा अभाव – खोतकर यांची स्पष्ट टीका.
-
ऊर्जा राज्यमंत्रींचा स्पष्ट इशारा: "शिस्तभंगासह गुन्हे दाखल करू."
-
ठेकेदारांनाही प्रामाणिकपणा राखण्याचे आदेश.
-
वीज प्रश्न कायम राहिल्यास आंदोलनाचा इशारा.
बैठकीस उपस्थित अधिकारी आणि मान्यवर:
या बैठकीस आमदार नारायणराव कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू के. पी., एसी सरग, कार्यकारी अभियंता पेन्सलवार यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Publisher
