जालन्याचा नकुल काफरे बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ स्टेनोग्राफर पदावर...

जालन्याचा नकुल काफरे बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ स्टेनोग्राफर पदावर...

जालना | प्रतिनिधी - जालन्याच्या नकुल अर्जुन काफरे यांनी परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर शासकीय सेवेत यश मिळवत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ स्टेनोग्राफर म्हणून नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या मित्र परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

नकुल काफरे यांनी शिक्षण काळापासूनच मेहनती व शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करून स्वतःला सिद्ध केले. कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन व चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत शासकीय सेवेत प्रवेश मिळवला.

काफरे यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच मित्रपरिवार अभिमान व्यक्त करत आहेत. पुढील सेवाकाळातही ते प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या यशाबद्दल सर्व स्तरांतून नकुल अर्जुन काफरे यांचे अभिनंदन होत असून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Read More हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार

Related Posts

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!