पनवेल शहर पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे

पनवेल शहर पोलिसांचा नवीन कायदे व सायबर जनजागृती कार्यक्रम

युवा आदर्श : पनवेल

शासनामार्फत करण्यात आलेल्या नवीन कायदे संदर्भात त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती अभियानाचा स्तुत्य उपक्रम पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत शहरातील व्हि.के.हायस्कूल येथे राबविण्यात आला. सदर उपक्रम पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड.सचिन पटेल यांनी नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अभंग यांनी पोलीस जनता समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच पोलीस उपनिरीक्षक अभय कदम यांनी सायबर गुन्हे संदर्भात मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक अंकुश शेलार यांनी अंमली पदार्थ दुष्पपरिणाम या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे म.पो.उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांनी महिलांविषयी गुन्हे संदर्भात मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमा दरम्यान उपस्थित विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना नवीन कायदा, सायबर फ्रॉड, अमली पदार्थांचे दुष्परिणाम,  महिलांविषयी कायदे व नवी मुंबई व्हाट्सअप चैनल बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन