मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर यांची उपस्थिती

युवा आदर्श : पनवेल

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 6 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांचे कवि संमेलनाचे  आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. काव्य रसिकांनी या काव्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

      मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर  आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचे सौंदर्य,काव्य सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या *"जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा"* कवि संमेलन कार्यक्रमामध्ये उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करायला लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज कवि अशोक नायगांवकर आपल्या कविता सादर करणार आहेत.
      याबरोबरच कुठे तरी भेटलेले जीव जिव्हाळ्याचे झाले... घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले अशा धीर गंभीर कवितेतून नाजूक कोमल भावना व्यक्त करणारे कवि प्रशांत मोरे, तर दुसऱ्या भाषेने पैसा, संपत्ती सारं सारं काही दिलं... पण अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठीने जगण्याचे "चीज” केले अशी मराठीची  स्तुती करणारे कवि डॉ. विजय देशमुख आणि कवयित्री  डॉ. स्मिता दातार, मृणाल केळकर, महानंदा मोहिते आपल्या कविता सादर करतील.

Tags:

About The Publisher

Related Posts