पनवेल :
नविन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज चा १३ वा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड करण्यात आली .
या कार्यक्रमास अतिथी ए. जी. बालरोगतज्ञ डॉ. स्वाती लिखिते व मुख्य अतिथी रोटरीचे २०२५-२६ डिस्ट्रिक्ट ३१३१ चे फाऊंडेशन को डायरेक्टर अस्थिरोगतज्ञ डॉ. अमोद दिवेकर उपस्थित होते. या सोहळ्यात रोटरी २०२४-२५ चे अध्यक्ष रो. विजय गोरेगांवकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रो. रुपाली यादव यांना अध्यक्ष पदाची कॉलर व क्लब चार्टर सादर केले. तसेच २०२४-२५ चे सेक्रेटरी रो. रूपेश यादव यांनी नवनिर्वाचित सेक्रेटरी रो. अर्चना जाधव यांना कॉलर सादर केली. नवनिर्वाचित अध्यक्ष रुपाली यादव यांनी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांची एक एक करून ओळख करून दिली त्यांना दोन्ही पाहुण्यांनी रोटरीच्या डायरेक्टर पदाची पिन लाऊन त्यांचा गौरव केला