डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा... तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय आत्मदहन
जालना । प्रतिनिधी - ‘समजानेसे अगर लोग समजते तो बासुरीवाला महाभारत नही होणे देता’ हे बुधवारचे महाभारत होऊ द्यायचे नसेल तर शासनाने वेळीत तोडगा काढवा, अन्यथा गुरे-ढोरे, वाहणे, शेतजमिनी ह्या जिल्हाधिकार्यांच्या हक्कात दानपत्र लिहून देऊन त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा ईशारा शेतकरी संघर्ष समितीचे दिलीप राठी यांनी सोमवार (दि 14) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी श्री राठी यांनी ही शेवटची भेट समजा असे म्हणतांना त्यांचे डोळे पाणावले होते तर कंठ ही दाटून आला होता. या पत्रकार परिषदेला गणेश महाराज कोल्हे, बळीराम कदम आदींसह शेतकर्यांची उपस्थिती होती.

आत्मदहनाच्या ईशार्याऐवजी आमदारांचा राजीनामा का मागत नाहीत असा प्रश्न श्री राठी यांना विचारला असता ते म्हणाले की, 16 तारखेपुर्वी निर्णय झाला नाही तर होणार्या आंदोलनामुळे जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल आणि याची संपूर्ण जबाबादारी ही मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील आमदारांची राहील आणि त्यानंतर आमदारांचाच काय तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ही राज्य मागेल.
पुढार्यांनी लक्ष दिले नाही याची खंत - राठी
जालना जिल्ह्याचा विचार करता येथे पाच आमदार आहेत. त्यापैकी समृद्धी बाधीत शेतकर्यांच्या जमिनी असलेल्या जालना, घनसावंगी, परतूर या ठिकाणचे आमदार आहेत. असे असले तरी आ. अर्जुनराव खोतकर यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही आमदारांनी विधानसभेत प्रश्न लावून धरला नाही. येत्या 16 तारखेला होणारे आंदोलन हे शेवटचे आंदोलन असून ज्यांनी ज्यांनी आमचे म्हणजेच शेतकर्यांचे प्रश्न लावून धरले. त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. मात्र, ज्या पद्धतीने पुढार्यांनी प्रश्न लावून धरायला पाहिजे होते तसे धरले नाहीत. तेथे ते कमी पडल्याची खंत श्री राठी यांनी व्यक्त केली.

About The Publisher
