जालन्याच्या श्रेयश बटुले याची महाराष्ट्राच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघात निवड

जालन्याच्या श्रेयश बटुले याची महाराष्ट्राच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघात निवड

जालना । प्रतिनिधी - जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालना तसेच साई काणे क्रिकेट अकॅडमी चा क्रिकेटपटू व तेज तर्रार गोलंदाज श्रेयस बटुले याची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे.

जिल्हा क्रिकेट असोशिएशन जालनाच्या संघाकडून खेळत असताना ऋषिकेश काणे यांच्या मार्गदर्शनाखाली  श्रेयस बटूले याने भन्नाट गोलंदाजी करून खेळातील विशेषता गोलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. 

या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष आमदार रोहित पवार, एमसीएसीएसीचे चेअरमन सचिन मुळे, एमसीएचे जॉइंट सेक्रेटरी संतोष बोबडे, अपेक्स कौन्सिल मेंबर व टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन राजु काणे,  जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष दिलीप शाह, रमेश मगरे, जॉइंट सेक्रेटरी अभिजीत चव्हाण, संतोष भारोटे, रमेश मांटे व साई काणे क्रिकेट अकॅडमीचे सर्व खेळाडू यांनी श्रेयस याचे अभिनंदन करून त्यास पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Tags:

Related Posts

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!