पनवेल
पनवेल शहरातील नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असलेला अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्वाचे ३५ वे वर्ष असून त्यानिमित्ताने पर्यावरण वाचवा व वाढवा यासाठी जंगल थीम राबवून जनजागृती अभियान करण्यात येणार आहे.
या मंडळाचे अध्यक्ष अल्पेश पाडावे, कार्याध्यक्ष नितीन जयराम पाटील, उपाध्यक्ष रुपेश नागवेकर, खजिनदार मयूर चिटणीस, सेक्रेटरी सचिन नाझरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेऊन दरवर्षी विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत असतात. नुकताच या मंडळाचा मंडप पूजन कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळी आरास करावी या उद्देशाने मंडळाने जंगल ही पृथ्वीवरील एक महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे.जंगलांचे संरक्षण करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हा उद्देश समोर ठेवून जंगल थीम हि संकल्पना राबवली आहे.