चंद्रशेखर आझाद मैदानात शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 भूमिपूजन सोहळा संपन्न; उत्सवातून राजकीय व सामाजिक एकतेचा संदेश
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी - जालन्यातील पारंपरिक आणि लोकप्रिय ठरलेला शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 यंदा अधिक मोठ्या आणि भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे चित्र भूमिपूजन सोहळ्यातून स्पष्ट झाले. चंद्रशेखर आझाद मैदानावर पार पडलेल्या या विधीला शहरातील अनेक मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व तरुणाईची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, शिवचैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक दानवे, सतिश जाधव, रमेश गोरक्षक, सौ. वर्षाताई ठाकूर, सौ. संगिताताई पांजगे, सौ. सखुबाई पनबिसरे, कपिल भूरेवाल, धनराज काबलीये, विष्णूबापू डोंगरे, शशिकांत घुगे, सुनिल पवार, संजय डोंगरे, सुनिल खरे, महेश निकम, सचिन मोहता, आनंद झारखंडे, सोमेश काबलीये, दत्ता जाधव, योगेश विधाते, रोहित दिपवाल, मनोज इंगळे, बद्रीनाथ भासंडे, कैलाश उबाळे, राजाराम जाधव, देविदास देशमुख, राजेश जोशी, रोहित खोडवे, कैलाश दानवे, केतन डोंगरे, अतिश अग्रवाल, पंकज देविदान, पृथ्वीराज देशमुख, गुलाब पनबिसरे, शाम उगले, सुहास वावरे, कृष्णा शिंदे, अजय कोल्हे, शुभम कापसे, ऋत्विक देवडे, आकाश बनवारी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्याने दहीहंडी महोत्सवाच्या भव्य तयारीला सुरुवात झाली असून, यावर्षीचा सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत जालना जिल्ह्यात राजकीय स्पर्धा आणि गटबाजीचे वातावरण जाणवले होते. मात्र अशा उत्सवांच्या निमित्ताने सर्व स्तरातील लोक एकत्र येतात. त्यामुळे दहीहंडी महोत्सव हा फक्त धार्मिक कार्यक्रम न राहता, सामाजिक एकता आणि राजकीय संतुलन साधण्याचे व्यासपीठ म्हणूनही महत्त्वाचा ठरतो.

About The Publisher
