नाकापेक्षा मोती जड! आमदारांच्या पीएचा 'रुबाब'
By Yuva Aadarsh
On
बदनापूर (जालना) - 'नाकापेक्षा मोती जड' या म्हणीचा प्रत्यय बदनापूर तालुक्यात येत आहे. राज्याचे आमदार जनतेच्या प्रश्नांसाठी स्वतः उपलब्ध असताना, त्यांच्या स्वीय सहायकांचा (पीए) मात्र 'रुबाब' वाढल्याचे दिसत आहे. आमदार नारायण कुचे यांचे स्वीय सहायक (पीए) खंडागळे हे सर्वसामान्य नागरिकांचे फोन उचलत नाहीत, तर दुसरीकडे आमदार कुचे स्वतः फोन उचलून लोकांशी बोलतात. यामुळे जनतेत नाराजीचे वातावरण आहे.


Tags:
About The Publisher
