पनवेल
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने आज शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा असलेल्या घरामध्ये धाड टाकून केलेल्या विशेष कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांना लक्ष्मी वसाहत येथे बेकायदेशीररित्या जुगार अड्डा चालवून तेथे रोख रक्कमेचा वापर करून 13 पानी पत्ते लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुनील वाघ, पोउपनि. हजरत पठाण, पो.ना.रवींद्र पारधी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीररित्या जुगार खेळणार्या आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापरलेली हस्तगत केली आहे व त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे कलम 4 (अ), 12 (अ) अन्वये कारवाई केली आहे. यामुळे बेकायदेशीररित्या जुगार तसेच इतर व्यवसाय करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
